प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका स्त्री सोबत अनेक व्यक्तीनी कंडोम न वापरता संभोग केल्यास एड्स होवु शकतो का?

1 उत्तर

शक्यता आहे!
निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आलेले असतील तर ते कधीही धोकादायकच असतात. अन कुणाला HIV/AIDS आहे हे वरून कळत नाही त्यासाठी चाचणी करावी लागते. ज्यांच्यासोबत संबंध आलेत त्यांना जर HIV/AIDS असेल तर तो त्या महिलेकडे सहज संसर्गित होऊ शकतो. व तिच्यामार्फत इतरांना ही संसर्गित होऊ शकतो.
एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी शेवटचे असुरक्षित शारीरिक संबंध (निरोध शिवाय केलेले) आल्यानंतर तिथपासून ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.
यानंतर प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जावे
https://letstalksexuality.com/hiv_aids/
https://letstalksexuality.com/ask-questions/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 0 =