प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएकाच वेळी एक किंवा अधिक व्यक्तींचे चुंबन घेतल्यास एच.आय.व्ही होतो का ?

एकाद्या स्त्रीला किस केला व त्या नंतर काही तासांच्या अंतराने दुसऱ्या स्त्री ला किस केला तर एड्स होतो का ? असे करणे अयोग्य आहे का ? काय खबरदारी घेता येईल ?

1 उत्तर

किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने एड्स होत नाही. एड्स ही आजाराची पुढची पायरी आहे. त्याआधी एचआयव्हीची बाधा होते. एकाहून अधिक स्त्रियांना किस केलं तरीही एचआयव्ही होण्याची शक्यता नाही. एचआयव्ही होण्यासाठी शरीरस्राव – रक्त आणि लैंगिक स्राव – एकमेकांत मिसळावे लागतात. एकमेकांचं चुंबन घेताना असे स्राव मिसळण्याची शक्यता नसते. त्यामुळे त्यातून एचआयव्हीची बाधा होत नाही.
एचआयव्ही बाधित व्यक्तीशी निरोध न वापरता केलेला संभोग (यामध्ये लिंगाचा योनीप्रवेश आणि लिंगाचा गुदद्वारात प्रवेश या दोन्हीचा समावेश होतो), एकच सुई/इंजेक्शन अनेक व्यक्तींनी वापरणे, एचआयव्ही बाधित रक्त शरीरात भरणे आणि एचआयव्ही बाधित आईकडून पोटातील गर्भाला – अशा पद्धतीने एचआयव्ही पसरतो. तोंडामध्ये काही व्रण असतील, किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल आणि अशा परिस्थितीत एचआयव्ही बाधित व्यक्तीशी मुख मैथुन केलं तर एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता निर्माण होते. आधीच काही लैंगिक आजार असतील तरी एचआयव्ही होण्याची शक्यता वाढते. नुसत्या स्पर्शाने, चुंबनाने, संपर्काने, मिठी मारल्याने एचआयव्ही पसरत नाही.
एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून काही काळजी नक्कीच घेता येईल
– लैंगिक आजार टाळण्यासाठी नेहमी आणि एकाहून अधिक जोडीदारांबरोबर लैंगिक संबंध येणार असतील तर निरोधचा वापर करा.
– एकमेकांची इंजेक्शन्स, सुया वापरू नका.
– रक्त भरण्याची वेळ आली तर रक्तावर एचआयव्हीची तपासणी झाल्याची आणि ते रक्त एचआयव्ही बाधित नसल्याची खात्री करून घ्या.

वरील खबरदारी घेतलीत तर एचआयव्ही आणि पुढे एड्सची बाधी नक्कीच टाळू शकाल.
बाकी राहिली प्रश्न योग्य, अयोग्य ठरवण्याचा. किती जणींना आणि किती वेळा, किती अंतराने किस करायचं हे ठरवणं आणि ते योग्य आहे का अयोग्य हे ठरवणं तुमच्या हातात आहे. जर या गोष्टीबद्दल तुम्हाला अपराधी वाटत असेल तर त्यावर विचार करा. आणि जर त्यामध्ये तुम्हाला आणि तुम्ही ज्यांना किस करत आहात त्यांना काही गैर, अयोग्य वाटत नसेल तर प्रश्नच नाही.
एचआयव्हीसंबंधी अधिक माहितीसाठी मुक्ता हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर आहे –

 (020) 25460102

 09422010446

 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 16 =