प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएच आय व्ही ची लागण झाल्या झाल्या लगेच कोणती लक्षणे जाणवतात का ? रक्तदाता हा 3 महीन्यापेक्षा कमी कालावधीतील बाधित रूग्ण असेल तर असे रक्त दुसऱ्याला चढवल्यास त्याला पुढे एच आय व्ही ची बाधा होऊ शकते का ?

मी २५ वर्षाचा आहे आणि माझ एका ३७ वर्षीय विवाहीतेशी बाह्य संबंध आहेत. आम्ही आठवड्यातुन ३-४ वेळा सेक्स सुध्दा करतो. तरी मला एच.आय.व्ही. होण्याची शक्यता आहे का? योग्य मार्गदर्शन करावे.

1 उत्तर

एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं असतं.

तुमच्या दुसर्या प्रश्नाविषयी बोलू या. संभोग करणार्या दोन व्यक्तींपैकी एकाला एच.आय.व्ही.ची लागण झाली असेल तर दुसर्याला व्यक्तीला होण्याची शक्यता असते. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 0 =