पुस्तक उपलब्ध आहे. तुम्ही वाचून विचार करून ठरवू शकता.
ओशो यांचे म्हणणे असे दिसते की संभोगामध्ये क्षणभर अशी अवस्था उत्पन्न होते ज्यामध्ये स्वतःचा वेगळेपणाचा भाव नाहीसा होतो आणि एक अनुपम अनुभव मिळतो. पण तो क्षणभरच टिकतो. त्याला राजवाड्याच्या प्रवेशद्वाराची उपमा ओशो देतात. संभोग हे प्रवेशद्वाराप्रमाणे आहे आणि समाधी ही आतल्या दालनासारखी आहे असे ते म्हणतात. समाधी ही संकल्पना पातंजल योगसूत्रामधली आहे आणि तिचा अर्थ बाह्य आणि आंतरिक जाणण्याच्या प्रक्रियेला मिळालेला विराम असा होतो. जाणणारा ज्ञाता, जाणण्याची ज्ञान ही क्रिया आणि जाणावयाची ज्ञेय वस्तू या तीन गोष्टी समाधी अवस्थेमध्ये लय पावतात.