दुध तयार होण्याची प्रक्रिया गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातच म्हणजे साधारणतः १६ आठवड्यांपासून सुरु होते. प्रसूतीनंतर स्तनांतून चिकदुध येते. काही स्त्रियांच्या स्तनांमधून प्रसुतीच्या आधीदेखील हे चिकदुध बाहेर येते तर काहींच्या येत नाही. मात्र यामुळे काहीही अडचण येत नाही. तसेच प्रसुतीच्या आधीच चिकदुध आल्यामुळे दुध निर्मितीमध्ये काहीही अडचण येत नाही. बाळाच्या जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करणे मात्र आवश्यक असते.
जर धोक्याचे गरोदरपण असेल उदा. आईला मधुमेह असेल तर बाळाचा जन्म होण्याआधी हे चिकदुध साठवून ठेवायला सांगितले जाऊ शकते. कमी दिवसांचे बाळ असेल, बाळाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल तरच असे डॉक्टर सुचवू शकतात.