मुल हवं असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा गर्भधारणा झाल्यावर स्त्रीने सर्व प्रकारचा पोषक आहार घ्यावा. आपल्याकडे खान-पानाबाबतचे खुप गैरसमज आहेत. कोणतेही गैरसमज न ठेवता सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, दूध, अंडी, मासे, मटण तसेच शेंगदाणा चिक्की असे व इतर पौष्टिक पदार्थ इ. खायला पाहिजे. तसेच गर्भधारणा झाल्यावर स्त्रीने भूक लागेल तसं किमान दोन-तीन तासांनी खायला पाहिजे.
प्रश्नातून तुम्हाला नक्की गर्भधारणेवेळी की झाल्यावर म्हणायचे आहे ते समजले नाही. वरील सर्व गोष्टी बाईच्या रोजच्या आहारात असाव्यात.