मासिकपाळी च्या 2 दिवस आधी विना कंडोम सेक्स केला. परंतु वीर्य बाहेर टाकले 99%. खात्रीने.
मासिकपाळी मध्ये 2 ऱ्या दिवशी सेक्स केला कंडोम वापरून. 3 ऱ्या दिवशी सकाळी अनवांटेड 72 घेतली 7व्या पर्यँत बल्डिंग झालं.
आज एक महिना झाला. मासिकपाळी आली नाही.
गर्भधारणा होईल का ? मासिक पाळी येईलका
कृपया मार्गदर्शन करा.
पाळीच्या 2 दिवस आधी संबंध आले असतील तर खरंतर गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्रीबीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुषबीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/conception/
दुसरा प्रश्न हा वीर्याच्या बाबतीत होता. योनीमैथुन करत असताना वीर्य योनीबाहेर पडले तरी अजिबातच योनीत गेले नाही असं खात्रीनं सांगता येत नाही. मासिक पाळीचक्रातील गर्भधारणेस पूरक काळात जर लैंगिक संबंध आले तर गर्भधारणा होण्यास एक शुक्राणू देखील पुरेसा असतो. त्यामुळे इथून पुढे लैंगिक संबंध ठेवत असताना गर्भधारणा नको असेल तर कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे.
या महिन्यामध्ये जर पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा. टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.
पाळीच्या काळात खरंतर अनवांटेड 72 घ्यायची काहीच गरज नव्हती. या काळात मूल होण्याची शक्यता कमी असते. आणि विचार न करता या गोळ्या घेण्यापेक्षा पुरुष जोडीदाराने निरोध वापरावा.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/