प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भधारना राहण्या साठी योनी मध्ये वीर्य सरळ आत मध्ये जावे का?
1 उत्तर

योनीमुखापासून गर्भाशयापर्यंत योनीमार्ग सरळ नसतो. त्यामुळं योनीमध्ये सरळ वीर्य जाणं शक्य नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वीर्यातील शुक्राणूंना स्वतःची गती देखील असते. त्यामुळं शुक्राणूंना बीजनलिकडं जाणं सोप्प जातं. गर्भधारणा राहण्यासाठी महत्वाची प्रक्रिया असते. स्त्री आणि पुरुषबीजाच्या मिलनाची. स्त्रीबीज महिन्यातून एकदाच परिपक्व होतं आणि बीजनलिकेत शुक्राणूची वाट पाहत बसतं जर पुढील १२ ते २४ तासात शुक्राणू तिथं आला नाही तर स्त्रीबीज विरघळून जातं. स्त्रीबीज बीजनलिकेत येण्याच्या प्रक्रियेला अंडॊत्सर्जन म्हणतात. मासिक पाळीच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जन होत असतं. त्यामुळं गर्भधारणासाठी आवश्यक काळ हा मासिक पाळीच्या १२ ते १६ दिवस आधी असतो. यासाठी तुम्हाला पाळी चक्राची माहिती असणं आवश्यक आहे.

गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 3 =