प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतुमच्या खूप साऱ्या प्रश्नाच्या उत्तरात लिंग डावीकडे किंवा उजवीकडे वाकडे असणे normal म्हटले आहे परंतु वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला वाकडे असणे problem आहे का?

2 उत्तर

लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही किंवा गर्भधारणा होण्यासाठीही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.

याचंही उत्तर तेच आहे. बाकामुळे/वाकडेपणामुळे लैंगिक संबंधांच्या वेळी अडचण येत असेल किंवा वेदना होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 14 =