प्रश्नोत्तरेदिवसा सेक्स करावा का,बायको खुप सेक्सी आहे ती रातभर सेक्स करा मनते त्यामुळे तब्येत खराब झाली आहे

1 उत्तर

पहिल्यांदा दिवसा सेक्स करावा का? या तुमच्या पहिल्या प्रश्नाविषयी बोलू यात. दोघांची इच्छा, संमती, मानसिकता आणि तयारी असेल तर सेक्सला काळ वेळाची मर्यादा नाही. सेक्स कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कुठे आणि कसा करावा हा सेक्स करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील व्यक्तिगत बाब आहे. हा निर्णय सर्वस्वी सेक्स करणाऱ्या व्यक्तींचा असायला हवा. दिवस, रात्र, पौर्णिमा, अमावास्या, एकादशी आणि सोमवार यावरून सेक्स करावा का नाही हे ठरविण्यापेक्षा दोघांची संमती, मानसिक तयारी, विश्वास आहे का, नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नये म्हणून योग्य ते गर्भनिरोधक वापरले आहे का, याचा विचार करणे अधिक योग्य ठरेल.

दुसरे म्हणजे, सेक्स केल्याने तब्येत कमी होत नाही. दोन्ही जोडीदारांची लैंगिक इच्छा वेगवेगळी असेल तर संवाद साधून लैंगिक सुखाचे इतर मार्ग निवडता येतील. लैंगिक सुख किंवा लैंगिक समाधान म्हणजे फक्त इंटरकोर्स (संभोग) नव्हे. एकमेकांच्या शरीराला, लैंगिक अवयवांना स्पर्श करणं, कुरवाळणं यातूनही लैंगिक आनंद मिळवता येतो. एकमेकांशी बोलून दोघांनाही आवडतील, झेपतील असे लैंगिक सुखाचे मार्ग शोधा. योग्य ती विश्रांती, झोपदेखील घ्या. तीही आवश्यक आहेच. लैंगिक संबंध सेक्स आयुष्यात महत्वाचे आहेच पण सेक्सशिवाय इतर कशातूनच आनंद मिळत नाही अशी स्थिती येऊन देऊ नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =