आमच्या शाळेत फक्त मुलेच होती, त्यामुलेआमचा कधीच मुलींशी बोलायचा प्रसंग आला नाही . पण कॉलेज मध्ये आल्यावर काही मैत्रीणी शी ओळखी झाल्या , आमचा एक ग्रुप तयार झाला. आम्ही एकमेकांचे बर्थडे celebrate केले.पण जेव्हा त्याच्या सोबत आम्ही तेव्हा एक 10 मिनट छान वाटत पणनंतर आम्हाला कसतरी वाटतं , मनात एक अपराधी पणा वाटतो उगीच बोलतोय आपण नंतर कसातरीच वाटू लागत . माझ्या काही शाळेतल्या मित्रांना सुद्धा असाच वाटत . अस का वाटत? यामागचं कारण कायअसेल ? आणि पुढे जीवनात मुलींशी बोलण्याचा प्रसंग येईलच तेव्हा काय कराव .
समाज आपल्यावर काही अनावश्यक बंधने आणि दबाव लादत असतो. मुलामुलींनी एकमेकांशी बोलायचे नाही हा त्यातीलच एक. अनावश्यक किंबहुना घातकच असे म्हणायला हरकत नाही. कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूला मुला-मुलींना एकमेकांशी बोलणं म्हणजे गैर किंवा चुकीचे असे वातावरण असेल तर आपल्याला देखील तसेच वाटायला लागते. अशा वातावरणामुळे मनात भीती किंवा अपराधीपणाची भावना तयार होऊ शकते.
खरंतर मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं, संवाद साधनं, मैत्री करणं किंवा प्रेमात पडणं यात काहीच चुकीचे नाही. अगदी नैसर्गिकच आहे ते. तुमचा ग्रुप असेल तुम्ही परस्परांचा आदर करून, संमतीने, इच्छेने कोणत्याही नात्याने किंवा नात्याशिवाय एकत्र भेटत असाल सेलिब्रेट करत असाल तर त्यात काहीही गैर किंवा चुकीचे नाही. आपण जर काही चुकीचे करत नाही तर त्याबद्दल अपराधी कशाला वाटून घ्यायचा ? आपल्या मनात रुजलेल्या किंवा समाजाने आपल्यावर लादलेल्या गोष्टींना आपण आव्हान दिले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार करून (आपल्या शरीरावर आपलेच डोके ठेवून) या गोष्टींचा विचार केला पाहिजे. विचारपूर्वक तुमच्या बुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्या केल्या पाहिजेत. मुलं-मुली एकत्र भेटत असतील तर त्याचा तोटा काहीच नाही उलट फायदाच आहे.
आता राहिला प्रश्न तुमच्या मनातील भीती कशी दूर करायची… सवयीने होईल ते… मुलींशी बिनधास्त बोला, मैत्री करा, शेअरिंग करा… अट फक्त एकच तुमची आणि समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती, आदर महत्वाचा…तुम्हाला तुमच्या मैत्रीसाठी खूप खूप शुभेच्छा… मुलींसोबतच्या मैत्रीचे, शेअरिंगचे अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा…
तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा…