एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं ही नैसर्गिक भावना आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्यांवर आपल्याला विविध गोष्टींचं आकर्षण वाटतं राहतं. किशोरावस्थेतनंतर काही लोकांना विरुध्द तर काहींना समलिंगी लोकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. आणि हे अगदी नैसर्गिक आहे. याला वयाचं आणि योग्य किंवा अयोग्यतेच अनुमान लावण्यापेक्षा नात्यांमध्ये असणाऱ्या विविध गोष्टींचा स्वीकार, जोडीदाराबद्दल योग्य समज व त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्याची स्वतःची तयारी यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. प्रेमं करणं यात नक्कीच काहीही वाईट नाही. मात्र समाजाकडून प्रेमाला होणारा विरोध हा अनेकवेळा जात आणि वर्ग व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी केला जातो. विरोध पत्कारून प्रेम करायचं की नाही? हा निर्णय मात्र स्वतःलाच घ्यावा लागेल.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा