तुमच्या उत्तराबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याखाली कोमेंट नसल्याने रिप्लाय असा इथे लिहितो आहे-
पहिला म्हणजे आम्हाला दोघांनाही इच्छा तर आहे ते करण्याची. तिच्याही मनात त्या भावना नक्कीच आहे. आम्ही बोललो आहोत ह्याच्यावर. मी कधीच तिच्यावर जबरदस्ती करणार नाही. पण जनरली मुलीना जास्ती भीती वाटते अस माझे मित्र म्हणतात. पण मी पुरुष असून मला ती प्रेग्नंट राहायचा जास्त धोका वाटतो. मग नंतर काय होणार ह्या खूप जास्तीच्या टेन्शनमुळे (कारण ते कंडोम आणि आयपील वैगरे पण फुलप्रुफ नसत अस वाचल आहे) कधी आम्ही एकत्र असलो तर मला ह्या टेन्शनमुळे ते करायची हिम्मत होत नाही. म्हणून मला वाटत की तिला माझ्या पुरुषत्वावरच शंका येईल. पण हे तिला सांगायची हिम्मत होत नाही. तुमच्या रिप्लायची वाट बघतो आहे. ह्या सगळ्यामुळे माझ कुठल्याच कामात लक्ष लागत नाही…
कोणतेच गर्भनिरोधक १०० टक्के सुरक्षित नसते असं म्हणतात ते खरं जरी असलं तरी कंडोमचा योग्य वापर केला तर गर्भधारणेची शक्यता कमी असते. (कंडोमचा वापर कसा करायचा हे समजून घेण्यासाठी यू ट्यूबवरील काही व्हिडीओजची मदत घेता येईल). गर्भनिरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.