शरीर संबंधांमध्ये पुरुषांचे एका क्षणी वीर्य स्खलन होते आणि त्यांना लैंगिक सुखाचा आनंद मिळतो. याला ऑरगॅझम म्हणतात. महिलांनाही हा ऑरगॅझम येतो, पण त्यात वीर्यस्खलन होत नाही. बघा, पुरुषांमध्ये वीर्य का असते कारण त्यात पुरुष बीज असतात ज्यांची गरज गर्भधारणेसाठी असते. या पुरूषबीजाचा महिलांच्या गर्भाशयाशी जोडलेल्या बीजवाहिनीतील स्त्री बीजाशी जाऊन संयोग व्हावा म्हणून वीर्यासारख्या द्रव पदार्थाची गरज असते. म्हणून पुरुषांना वीर्यस्खलन होते. स्त्रियांना ऑरगॅझम म्हणजेच आनंदाच्या एका उच्च स्थितीचा अनुभव येतो (आणि एका लैंगिक क्रियेत तो पुरुषांच्या तुलनेत अनेकदा येऊ शकतो) पण तिथे वीर्यस्खलन होत नाही तर योनिमार्गातील स्नायू आकुंचन/प्रसरण पावून त्या सुखाची अनुभूती त्यांना होते.
खाली आपल्या वेब साईट वरील एक खूप छान लेखाची लिंक देत आहोत तो वाचा.