प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्नाला आठ महीने झाले पत्नी अजून तृप्त झाली नाही. त्यामुळे ती चिडचिड करते. काही उपाय सांगा प्लीज.

1 उत्तर

अगदी महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. खरेतर आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या लैंगिक इच्छेचा, आनंदाचा, लैंगिक सुखाचा किंवा एकूणच लैंगिकतेबद्दल फारच कमी दाखल घेतली जाते. बऱ्याचदा स्त्री लैंगिकसंबंधांमध्ये तृप्त किंवा समाधानी झाली की नाही? याचा विचार पुरुष करत नाहीत. लैंगिक जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक सुखाचा आणि आनंदाचा विचार करणे गरजेचे असते.

स्त्रीला उत्तेजित व्हायला पुरुषापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे दोघांना जवळपास एकाचवेळी परमोच्च लैंगिक सुखाचा बिंदू अनुभवणं अवघड होतं. यासाठी ‘फोरप्ले’ म्हणजे संभोगाआधी एकमेकांना पूर्णपणे उत्तेजित करणे गरजेचे असते. शिवाय लैंगिक क्रिया म्हणजे लिंग योनीच संबंध, योनीत लिंग सारणे एवढाच नाही. इतरही अएंक प्रकारे एकमेकांना आनंद देता घेता येतो. ते प्रकार शोधा. एकमेकांशी बोला. प्रत्येकाची लैंगिक सुखाची, तृप्तीची कल्पना वेगळी असू शकते त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे एकमेकांशी संवाद साधून शोधा.

लवकर वीर्यपतन होत असेल तर स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट पद्धतीचा अवलंब करून पहा. याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 1 =