प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsब्लू फ़िल्म बघुन किंवा पोर्न स्टोरीज वाचून हस्थमैथुन करने वाइट आहे का हस्थमैथुन करण्याचा योग्य कालावधि किती असावा
1 उत्तर

आपण ब्लू फिल्म का पाहतो? किंवा पोर्न स्टोरीज, पुस्तकं, मासिकं का वाचतो? कारण आपल्याला त्यातून लैंगिक उत्तेजना मिळते. लैंगिक इच्छा निर्माण होते आणि त्यातून लैंगिक सुखही मिळतं. ब्लू फिल्म पाहणं किंवा पोर्न गोष्टी, मासिकं वाचणं चुकीचं नाही. त्यात दाखवलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात तशाच्या तशा आपल्याला करता येतीलच असं नाही हे लक्षात ठेवून या फिल्म्स पहा किंवा गोष्टी वाचा. 
आणि खरं तर तुमचं अभिनंदनच करायला पाहिजे. ब्लू फिल्म पाहून निर्माण झालेली सेक्सची इच्छा शमवण्यासाठी तुम्ही इतर कुणावर जबरदस्ती करत नाही. अशा फिल्म्स पाहून मिळेल त्या स्त्रीला गाठून किंवा अगदी छोट्या मुलीवरही सामूहिक बलात्काराचे गुन्हे अलिकडच्या काळात झाले आहेत. तुम्ही या फिल्म पाहून इतरांना कुणालाही इजा न करता, स्वतः हस्तमैथुन करता म्हणजे तुम्ही एक शहाणे व्यक्ती आहात. त्यामुळे तुमचं अभिनंदन!
हस्तमैथुन करण्याचा योग्य कालावधी आपला आपण ठरवावा. आपल्या इतर गोष्टींमध्ये, अभ्यासात, कामात, इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडथळा येत नाही ना, आपण बाकी काही न करता केवळ हस्तमैथुनच करत नाही ना हे पहा. प्रत्येकाची इच्छा आणि त्याचं शमन वेगवेगळं असतं. त्यामुळे आपला सूर आपणच शोधायचा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 4 =