सेक्स ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. तुम्हाला जर सेक्स करताना आनंद मिळत नसेल तर त्याची कारणं शोधली पाहिजे. लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचारामुळं असं होवू शकतं. पण हेच एकमेव कारण नाही. सेक्ससाठी आपण तयार आहोत की नाही हे प्रत्येकानं ठरवणं आवश्यक आहे. यासाठी तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतं हे जास्त उपयोगी राहील. सेक्स करण्यात अजिबात इच्छा नसणं हे देखील नैसर्गिकच आहे. तुमच्या मनात सेक्सविषयी अनेक प्रश्न, भिती किंवा गैरसमज असतील तर कदाचित सेक्स करताना आनंद मिळणार नाही. असे प्रश्न, शंका समुपदेशकांना किंवा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून विचारा. शिवाय तुमच्या जोडीदारासोबत बोला. तुमची समस्या सांगा आणि जोडीदाराची मदत घ्या. आणखी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की, स्त्री पुरुषांच्या लैंगिकदृष्ट्या एकत्रित येण्याला सेक्स, संभोग किंवा लैंगिक संबंध असे शब्दही वापरले जातात. मुख्य म्हणजे हे शब्द हीन अर्थाने किंवा शिव्यांमध्ये वापरले जात नाहीत.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा