प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ वय 22 आहे माझी योनी बारिक आहे असे मला इतर मुलींच्या योन्या पाहून वाटतय मी अजुन वर्जिन आहे सेक्स करताना खुप दुखेल का
1 उत्तर

मैत्रिणींकडून किंवा पॉर्न क्लिप्समधून अनेकवेळा अशी चुकीची माहिती मिळत असते. प्रत्येकाच्या शरीराची रचना सारखीच असते, परंतू शरीराच्या अवयवांच्या आकारामध्ये, रंगामध्ये फरक असू शकतो. योनीचं देखील असंच आहे. योनीचा आकार आणि रंग प्रत्येकीचा वेगळा असू शकतो. योनीमार्ग अतिशय लवचिक स्नायूंनी बनलेला असतो त्यामुळं मोठ्या आकाराचं लिंगदेखील सहज आतमध्ये जावू शकतं. यात चिंता करण्याचं कारण नाही. लैंगिक भावना उत्तेजित झाल्यावर योनीमधून पारदर्शक चिकट असं वंगण(लुब्रीकंट) बाहेर येतं ज्यामुळं संभोग करताना लिंग योनीमध्ये जाताना त्रास होत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 0 =