नमस्कार मी पहिल्यांदाच या वेबसाईटएल भेटलो आपलं कार्य अप्रतिम! मी सेक्स करू इच्छीत,माझं लग्न नाहि झालं एकाद्या सतरहीया आपण सेक्स बद्दल कस तयार करू शकतो
तुम्ही वेबसाईटबद्दल दिलेल्या अभिप्रायाबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या पुरुषसत्ताक समाजामध्ये पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांना आवश्यक ते स्वातंत्र्यही आहे. परंतू असे पर्याय वापरावेत की नाही? ही प्रत्येकाने ठरविण्याची बाब आहे. फक्त नात्याने नवरा-बायको असलेल्यांमध्येच लैंगिक संबंध असू शकतात असं अजिबात नाही. पण एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना त्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर, संमती आणि पारदर्शकता महत्वाची आहे. फक्त संभोग (सेक्स) करण्यासाठी कोणाला तरी तयार करणं या दृष्टीकोनावर मात्र विचार व्हायला हवा. विविध नात्यांमध्ये लैंगिक संबंध असू शकतात. किंबहुना नाती तयार झाल्यानंतर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी विचारता येवू शकतं. मात्र फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान (१८ वर्ष पूर्ण) आहेत का? दोघांचीही ठेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.