याचा तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला काही त्रास होतो का? तसे नसेल तर त्यात काही वावगे नाही. तुम्ही किंवा तुमची जोडीदार तुम्हाला समाधान मिळण्यासाठी आणखीही काही मार्ग शोधू शकता. उदा. हस्तमैथुन. जर त्रास होत असेल आणि तुमचे सहसा स्खलन होत नसेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील किंवा योग्य त्या डॉक्टरांकडे (सेक्सॉलॉजिस्ट) पाठवतील.
खरे पाहता ही एक खूप दुर्मिळ स्थिती आहे. बहुतेक पुरुषांची शिघ्र पतनाची समस्या असते. पण वीर्य स्खलनच होत नाही हे सामान्य नाही. याला डिलेड अथवा रीटार्डेड इजाक्युलेशन म्हणतात. याला अनेक कारणं असू शकतात. उदा. तुम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधे घेत असाल तर त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरे म्हणजे वयोमानापरत्वे लिंगातील नसांमध्ये संवेदनशीलता कमी होऊन शिथिलता येते. लिंग पुरेसे ताठर होत नसेल तरीसुद्धा स्खलनात अडथळा येऊ शकतो. एखाद्या ऑपरेशन दरम्यान नसेला इजा पोचणे, दारूचे सेवन, ग्रंथीमधील बिघाड, पुरेशी झोप नसणे, चिंता अशी कारणेही यामागे असू शकतात. तुमच्या बाबत काय कारण असेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण आमचा सल्ला आहे की जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटा अथवा न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशाच आणखी प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील लिंक्स वर क्लिक करा…
https://letstalksexuality.com/question/sambhog-veli-lovker-shut-hot-nahi-bai-vaitagun-jate/
https://letstalksexuality.com/question/partner-lavakar-shant-hot-nahi/