प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या लिंगाच्या मुत्रमार्गाची नळी थोडी मोठी आहे: माझ्या लिंगाची नळी लिंगाच्या खालच्या भागाला असुन त्या नळीचा उघड भाग अर्धा सेमी लांब आहे कधी कधी अस वाटते की हा उघड भाग भविष्यात संभोग क्रियान मध्ये नुकसान होऊ शकते असा थोडासा लिंगाची नळी उघडी असेल तर पुढे धोका निर्मान होऊ शकतो का ?
1 उत्तर

सर्वात पहिलं म्हणजे, मूत्र मार्गाची नळी ही लिंगाच्या खालच्याच भागात असते. त्यामुळ याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही.

प्रश्नातील दुसर्‍या भागाकडं वळू या. मूत्र मार्गाची नळी मोठी आहे असा तुमचा अंदाज आहे की तुम्हाला कोणी सांगितलं आहे? अनेकवेळा पुरुषांच्या मनामध्ये लिंगाच्या आकाराबाबत, मापाबाबत खूपच गैरसमज आढळून येतात. यातील अनेक समज-गैरसमज मित्रांच्या सांगण्यामुळं किंवा पॉर्न क्लिप्स पाहून तयार होतात. त्यामुळं तुम्ही विचारलेला प्रश्न तयार होत आहे हे तपासून पहा. मूत्र मार्गाच्या नळीमुळं भविष्यात काही समस्या निर्माण होईल असं वाटत नाही. तरीही तुम्हाला खात्री करुन घ्यायची असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 2 =