प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझ्या स्तनांचा आकार फार कमी आहे, ते नाहीच असे वाटते आकार वाढवण्या साठी काय करावे?

1 उत्तर

आपल्या अवयवांचं रूप, रंग, आकार कसा/किती असावा हे सर्व जनुकं, अनुवंशिकता, संप्रेरकं, पर्यावरण, पोषणाची स्थिती ई. गोष्टी ठरवत असतात. त्यातील काही गोष्टी जन्मतःच ठरतात तर काही जन्मानंतर. स्तनांचा आकार मुख्यतः जनुकं ठरवतात.

संप्रेरक (हार्मोन्स) बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. मुलगा किंवा मुलगी वयात येत असताना त्यांच्या शरीरात काही बदल दिसायला सुरुवात होते त्याला हा संप्रेरकांचा प्रभावच कारणीभूत असतो. मुलींच्या शरीराला विशेषतः छातीला जी गोलाई प्राप्त होते ती ह्या संप्रेरकांच्या संतुलनामुळेच. हे संतुलन जर नसेल तर त्याचा परिणाम स्तनांच्या आकारावर ही होतो. त्या सोबतच तुमचे वजन आणि वय किती आहे ह्यावरही स्तनांचा आकार ठरतो. जिथे कुपोषण आहे, पौष्टिक अन्नाची कमतरता आहे तिथे एकूणच शरीराच्या वाढीवर परिणाम होतो.

त्यामुळे जर वजन कमी असेल तर स्वतःची एकूण तब्येत आगोदर सुधारा.

या गोष्टीचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर आणि दैनंदिन आयुष्यावर होऊ देऊ नका. आपल्या शरीराविषयी असलेल्या नकारात्मक भावना आपल्या आयुष्यावर खूप खोल परिणाम करत असतात. या भावना दूर करण्यासाठी त्या आधी कशातून निर्माण झाल्या याचा शोध घ्यायाला हवा. सौंदर्याच्या बाजारू कल्पना टीवी पेपरमधून वस्तू विकण्यासाठी प्रसारित केल्या जातात. त्यांना बळी न पडणं महत्वाचं..

अशाच प्रकारच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://letstalksexuality.com/question/how-to-expand-the-breast-size/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 15 =