प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळी नंतर कधी संबंद ठेवाव तर गर्भ धारना होईल
1 उत्तर

यासाठी मासिक पाळीचं चक्र समजून घेतलं पाहिजे. गर्भधारणा होण्यासाठी पाळीचक्रातील अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते. तुम्हाला स्वतःचं पाळीचं चक्र किती दिवसांचं आहे आणि कसं आहे हे समजलं तर अंडोत्सर्जनच्या काळात संभोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त राहील. गर्भधारणा नक्की कशी होते? याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 2 =