सर मी आणि माझ्या गर्लफ्रेंड ने 10 दिवसांपूर्वी प्रोटेकशन वापरून सेक्स केला आणि तिच्या मासिकपाळीचा1 दिवस चुकला आहे या परिस्थितीत काय करावे प्लीज सुचवा
प्लीज डोन्ट पॅनिक. निरोध वापरुन संबंध आल्याने घाबरण्याचे कारण दिसत नाही.
सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा. जरी झाली असेल तरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करू शकता. कृपया कोणताही घरगुती उपाय करू नका.
तुमचे लैंगिक संबंध तुमच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात गर्भनिरोधक न वापरता आले आहेत का? (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.)
मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/