प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी तिला i-pill चि गोळि दिली,

एकाआठवड्यात ipillchya 3 गोल्या घेतल्यत अणि परत एकदा विना कंडोम सेक्स जालाय तर अता काय करु गोळी देऊ की नको।

हा आमच लग्न जलेले आहे। पण privecyनहीं मिलाल्यामुले असजाल

1 उत्तर

तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यास खूपच उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व! तुम्हाला त्यावेळी असलेल्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन भेटणे अगदीच गरजेचे होते. खाजगीपणा न मिळाल्याने तरुण-तरुणींना अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, I-pill सारख्या गोळ्या इमर्जन्सी मध्ये वापरण्याचे गर्भनिरोधक साधन आहे. एका आठवड्यामध्ये ३ वेळा गोळ्या दिल्या हे तर अतिच झाले कारण या गोळ्यांचा स्त्रियांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. I-pill चा वापर शक्यतो टाळा.

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा सुरक्षित पर्याय आहे.

तुम्हा दोघांनाही भावी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा!

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 20 =