मुल होण्यासाठी किती दिवसांनी सेक्स करावा हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण मासिक पाळी च्या चक्राविषयी जाणून घेवूयात. मासिक पाळीचे चक्र हे सर्वसाधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे असते. या काळात एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यासाठी पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला की त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बऱ्याच जणांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन १४ व्या दिवशीच होत. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशीराही होत असत. प्रत्येकाचा मासिक चक्राचा काळ वेगळा असल्यामुळे अंडोत्सर्जनाचा काळ ही वेगळा असू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरील https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वर क्लिक करा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा
Mula honyasathi kitvya divashi samog karyache