सेक्स आणि सेक्स संबंधी गोष्टी बोलत असताना मनामध्ये संकोच असू शकतो. आपल्या समाजामध्ये या विषयाबद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही. म्हणूनच एखाद्या मुलीला किंवा महिलेला मेडिकल मध्ये सॅनिटरी नॅपकीन मागताना किंवा पुरुषाला कंडोम मागताना किंवा इतर काही गोष्टी मागताना संकोच किंवा अवघडलेपण वाटू शकतो.
पण एखादी महिला मेडिकलमध्ये काम करत असेल तर तिला याची कल्पना असणारच की, या गोष्टी तिच्याकडे मागितल्या जाणार त्यामुळे महिलेला कंडोम मागण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला तुमच्याच संकोचावर किंवा अवघडलेपणावर थोडे काम करावे लागेल. मेडिकलमध्ये पुरुष असताना तुम्ही जसे कंडोम मागता तसाच महिलेला देखील मागण्यास हरकत नाही.