योनीत लिंग किती घालावे
खरंतर, योनीत लिंग किती आत घालावे, सेक्स किती वेळ करावा हे सेक्स करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र मिळून ठरवण्याच्या गोष्टी आहेत. आपण हे समजून घेतले पाहिजे की, लिंग जास्त आत गेले म्हणजे जास्त लैंगिक समाधान मिळते हाच मुळात एक गैरसमज आहे. संभोगाच्या वेळी स्त्रीच्या योनिमुखापासूनचा २ इंच योनीचा भाग फुगून त्या भागाला लिंगांचे जास्त घर्षण होत असते. योनीच्या आतल्या भागात संवेदनशीलता कमी असते. म्हणूनच योनिमैथून करताना पुरुषाचे उत्तेजित लिंग दोन इंच असेल तरीही स्त्रीला पूर्ण लैंगिक सुख मिळू शकते. लैंगिक सुख हे किती वेळ संभोग केला किंवा लिंग योनीत किती आत गेले यावर अवलंबून नसून लैंगिक ज्ञान, संवाद, आदर, संमती, विश्वास, नाविन्य, वातावरण निर्मिती, यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आपल्या वेबसाईट वर लैंगिक सुखाबद्दलचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी वेबसाईट वरील ’सेक्स बोले तो’ हा सेक्शन आणि ’आधीच्या प्रश्नांची उत्तरे नक्की वाचा. तुम्हाला शोधण्यास सोपे जावे म्हणून लिंक पाठवत आहे.
https://letstalksexuality.com/question/
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा