माझ्या लिंगाच्या पुढील भागास शिस्नमुंड येथिलत्वचा लाल होते तसेच जळजळ होते काय करावे मला मलम सुचवा डॉ. जाण्यास लाज वाटते जास्त सेक्स केल्याने असेहोते का? आम्हाला सेक्स करण्याची फार आवड आहे आम्ही रोज सेक्स करतो
शिश्नमुंडाची त्वचा लाल होण्यामागे काही बॅक्टेरिअल इंफेक्शन वा लिंगसांसर्गिक आजार (STI) असे काहीही कारण असू शकते. तेव्हा नक्की कारण माहित करुन घेणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी महत्वाचे आहे डॉक्टरांना भेटणे.
महत्वाची गोष्ट अशी की लाज वाटून घ्यायची गरज नाहिये. तसेच जास्त किंवा कमी वेळा सेक्स करण्याशी त्याचा संबंध नाही तर जोडीदारांपैकी एकाला जरी संसर्ग असेल तर तो दुसर्याला होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे योग्य निदान करून औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर प्रयास च्या (म्हणजे आमच्या) अमृता क्किनिक मध्ये येऊ शकता.
पत्ता : प्रयास-अमृता क्लिनिक, आठवले कॉर्नर, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे – 411 004, दूरध्वनी: 8605882649 / 8087015726