लिंग उद्यपित झाल्यानंतर चिकट पारदर्शक पदार्थ बाहेर येतो त्याला वंगण असं म्हणतात. यामुळं लैंगिक संबंध सुखकर होतात. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषबीज(शुक्राणू) यांची आवश्यकता असते. लिंग उद्यपित झाल्यावर येणार्या वंगणामध्ये शुक्राणू नसतात. त्यामुळं वंगणापासून गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. जर वीर्य कोषातून वीर्यपतनापूर्वी काही वेळ आगोदर एक दोन थेंब वीर्य बाहेर आलं तर त्यातून गर्भधारणा होण्य़ाची शक्यता नाकारता येत नाही. तसंच ज्यावेळी परमोच्च क्षण येतो त्यावेळी वीर्यकोषातून शुक्राणू बाहेर पाठवले जातात. लिंगाच्या बाहेर येताना हे शुक्राणू वंगणामध्ये मिसळले जातात. त्यामुळं एकदा वीर्यपतन झाल्यावर वंगणामध्ये शुक्राणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा