माझंवय 23 आहे माझा लिंगवरची कतडी सुद्धा खोललेली आहे त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचा पदार्थ हा मी माझ्या हाताने बाहेर काढतो यामुळे माझ्या sexual लाईफ वरती काही परिणाम नाय होणार ना
याचा आणि लैंगिक सुखाचा काही संबंध नाही. लिंगावरील त्वचेखाली तयार होणारा हा पदार्थ लिंगाच्या नियमित स्वच्छतेच्या अभावी तयार झालेला असतो. त्यामुळे लिंगाला जंतूलागण किंवा बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्वचेखाली हा पिवळसर पदार्थ तयार होऊ नये म्हणून लिंग आणि आसपासची जागा एक दिवस आड करून कोमट पाण्याने स्वच्छ करत राहणे गरजेचे असते.