लिंगाची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. मुळात तुम्हाला लिंगाचा आकार का वाढवायचा आहे यावर विचार करा. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग लहान आहे की मोठे यापेक्षा संबंधाच्या वेळी ते ताठ राहते का ? तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का? हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. बहुतेक वेळा पौरुष आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/ ही लिंक पहाल.
सतत हस्तमैथुन करने योग्य की अयोग्य
हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.
आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) :- https://letstalksexuality.com/question/
उपाय सांगा
उपाय सांगा
लिंगाची जाडी लांबी
4 labe 2 jadi