वीर्य वाढवण्यासाठी कृत्रिम पर्याय नाही. वीर्य निर्मिती होण्यासाठी शरीराची एक रचना सतत कार्य असते. हृदयाचा प्रत्येक ठोक्याला साधारण १००० पुरुषबीजं तयार होत असतात. मरेपर्यंत त्यांची निर्मिती चालूच राहते. त्यामुळं याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही. शरीरातील सर्व यंत्रणा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी तंदुरुस्त असणं महत्वाच आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं आणि चौकस आहार घेणं नेहमीच फायदेशीर राहतं.
प्रश्नातील काही महत्वाचा भाग. वीर्य निर्मिती कमी होते हे तुम्हाला कसं कळलं? हा तुमचा अंदाज आहे की चाचणीचा निकाल(test result) आहे? कारण अनेकवेळा पॉर्न क्लिप्स(ब्लू फिल्म्स) पाहून त्यातील दाखवलेल्या अतिरंजित कल्पनेमुळं अनेक पुरुषांना ते खरं वाटायला लागतं. हे नेहमी लक्षात ठेवा, पॉर्न क्लिप्समध्ये दाखवलेली दृष्ये ही अतिरंजित कल्पना किंवा आभासी असतात. कधी कधी यामध्ये खोट्या गोष्टीदेखील दाखवल्या जातात. त्यामुळं या क्लिप्समधील दृष्यांनुसार तुमच्या शरीराची तुलना करु नका.
जर तुम्हाला गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येत असेल तर अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते.
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/