प्रश्नोत्तरेवीर्य पाजून टाकणे हे बरोबर आहे का

1 उत्तर

लैंगिक संबंधामध्ये  ‘मुखमैथून’ हा एक प्रकार आहे ज्यामध्ये पुरुषाचे लिंग आपल्या तोंडात घेणे किंवा स्त्रीच्या योनी, शिस्निकेला जिभेने स्पर्ष सुख देणे हे प्रकार आहेत. सगळ्यांनाच संभोगाचा हा प्रकार आवडतोच असे नाही. काहींना तो आवडतो तर काहींना किळसवाणा वाटू शकतो.
 
वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होत नाही अथवा कोणताही अपाय होत नाही. जोडीदाराला कोणताही लैंगिक आजार अथवा संसर्ग नसेल तर वीर्य प्राशन करण्यामध्ये किंवा मुखमैथून करण्यात काही धोका नाही. लैंगिक आजार असेल आणि स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या तोंडामध्ये काही जखमा असल्या तर  मात्र या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी कंडोमचा वापर केलेला चांगला.
 
तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मुखमैथुनात आनंद मिळत असेल,  काही वावगं वाटत नसेल तर यात काहीही चुकीचं नाही. लैंगिक संबंधामध्ये आपल्या जोडीदाराची इच्छा, संमती असणं खूप महत्वाचं आहे. तरच ते संबंध आपल्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी सुखकर होऊ शकतील.
 
Hemant apre replied 8 years ago

Virya tondat gelyane kahi ajar hotat ka

I सोच replied 8 years ago

वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होत नाही अथवा कोणताही अपाय होत नाही. जोडीदाराला कोणताही लैंगिक आजार अथवा संसर्ग नसेल तर वीर्य प्राशन करण्यामध्ये किंवा मुखमैथून करण्यात काही धोका नाही. लैंगिक आजार असेल आणि स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या तोंडामध्ये काही जखमा असल्या तर मात्र या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी कंडोमचा वापर केलेला चांगला.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 17 =