शरीर संबध asked 7 years ago

मी एक 35 वर्षीय गृहिणी आमच्या लग्नाला5 वर्ष झाली

प्रॉब्लेम असा की आता सेक्सच्या वेळी माझ्या योनी कोरडीच राहते

1 उत्तर

पहिल्यांदा लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीमध्ये ओलसरपणा वाढतो म्हणजे नक्की काय होते, हे समजून घेऊयात. स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होणार नाही. म्हणूनच लैंगिक संबध करत असताना संमती आणि इच्छा खूप महत्वाची आहे.

योनिमधील ओलावा कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मेनोपॉज. वयाच्या ४० -४५ च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं याला मेनोपॉज असं म्हणतात. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक इच्छा आणि भावभावनाही बदलू शकतात. योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं हा एक होणाऱ्या बदलांपैकी एक बदल आहे. मेनोपॉजविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/menopause/

योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं. योनीतील ओलसरपणा वाढविण्यासाठी काहीजण कृत्रिम वंगण(लुब्रींकंट)/जेली चा वापर करतात. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 20 =