प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशस्त्रक्रिया करून स्तनांचा आकार बदलता येतो का ? आणि असे केल्याने गरोदरपणानंतर स्तनपानावर ( दुध निर्मितीमध्ये ) काही अडचण येते का ?

1 उत्तर

हो, शस्त्रक्रिया करून स्तनांचा आकार बदलता येतो.
स्तनवृद्धी शस्त्रक्रियेत स्तनामागे प्लास्टिकची जेली भरलेल्या पिशव्या (Implant) सरकवल्या जातात. ह्या पिशव्या स्तनाच्या थेट खाली तरी सरकवल्या जातात किंवा त्याच्याही खाली स्नायू असतो (Pectoralis), त्याच्याखाली तरी सरकवल्या जातात किंवा दोन्ही थोडे थोडे केले जाते.
शस्त्रक्रिया केल्याने गरोदरपणानंतर स्तनपानावर ( दुध निर्मितीमध्ये ) काही अडचण येत नाही.
खरं तर मुळात स्तन मोठे करण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. आपले स्तन, आपले अवयव, आपले शरीर जसे आहे तसे खूप सुंदर आहे. तेव्हा सौंदर्याच्या चुकीच्या कल्पनांना छेद देऊन योग्य तो निर्णय प्रत्येकाने घ्यावा हिच सदिच्छा !
स्तनांच्या आकाराविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/breast_size/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 10 =