काही जण खूप शांत असतात ते जास्त कोणाशी बोलत ही नाहीत ना कोना कडे लक्ष देत …स्वत्याच्याच गुंगीत असतात …अशा लोकांना Attraction वाटत नसतं का कोणाचा , का ते अशीच असतात आयुष्यभर ..

खूप जास्त असतील तर त्यांची कीव येते के होईल अश्याच ….कोणी त्याच्यावर जबरदस्ती केली तर ??….

1 उत्तर

व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. हे एकच उत्तर आहे. शांत स्वभाव आणि एखाद्याचे आकर्षण वाटणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. शांत स्वभाव असलेली व्यक्तीला आकर्षण वाटू शकतं किंवा प्रत्येक शांत नसलेल्या व्यक्तीला आकर्षण वाटेलच असं नाही.

तुम्हाला अशा व्यक्तींवर कुणी जबरदस्ती करेल असं का वाटतं ? शांत असणारी व्यक्ती, स्वतःच्या गुंगीत असणारी व्यक्ती स्वतःचे संरक्षण करू शकणार नाही असं तुम्हाला का वाटतं यावर विचार करा. तुम्हाला मतिमंद किंवा मनोरुग्ण व्यक्तींबद्दल बोलायचे आहे का? खरंतर तुमचा नेमका प्रश्न काय आहे तेच लक्षात आलं नाही. कृपया तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नेमकेपणाने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणं सोपं जाईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 19 =