प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसत्यशोधक विवाह लावल्यानंतर वधु-वरांना सर्टिफिकेटस कोणी द्यावे म्हणजे विवाह नोंदनी करणे सोपे जाईल..?
1 उत्तर

सत्यशोधक आणि विवाह नोंदणी या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. सत्यशोधक पध्दती मुख्यतः धार्मिक प्रथा, परंपरा आणि असमानतेला फाटा देणार्‍या आहेत. लग्नांमध्ये जे काही विधी केले जातात ज्यामध्ये स्त्री-पुरुष असमानता, भेदाभेद किंवा स्त्रीयांचं वस्तुकरण केलं गेलं आहे त्याला तुम्हाला पर्याय म्हणून सत्यशोधक पध्दतीचा वापर करता येतो. सत्यशोधक लग्न पध्दतीमध्येही बरचं वैविध्य दिसून येतं.

तुम्ही केलेल्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी विवाहाची नोंदणी करणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या भागामधील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करणं आवश्यक असतं. विशेष विवाह नोंदणी कायदा, १९५४ नुसार कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्ती एकमेकांशी(स्त्री-पुरुष) प्रथा, परंपरा न पाळता नोंदणी पध्दतीनं विवाह करु शकतात.

सत्यशोधक पध्दतीनं विवाह केल्यावर, विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. एका महिन्याच्या नोटीस पिरीयड नंतर तुम्हाला नोंदणीसाठी पुन्हा विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन तीन इतर लोकांच्या साक्षीने सह्या कराव्या लागतात. यानंतर तुम्हाला लगेच एक विवाह प्रशस्तीपत्र दिलं जातं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 8 =