प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसर मी आणि माझी मैत्रीण सेक्स करू इच्छतो पण दोघेही रक्तस्त्रावाला घाबरत आहोत. उपाय सांगा रक्तस्त्राव झाल्यावर थांबवण्याचा उपाय सांगा

1 उत्तर

अनेकवेळा लैंगिक ज्ञानाअभावी पहिल्या सेक्सचा आनंद घेत नाही. तुम्ही त्याविषयी जागरुक आहात आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात याबद्दल तुमचं अभिनंदन. आता तुमच्या प्रश्नाविषयी बोलू या. सगळ्याच मुलींना पहिल्या सेक्सच्यावेळी रक्तस्त्राव होतो असं अजिबात नाही. जवळ जवळ सर्वच मुलींना जन्मापासूनचं योनीच्या खालील भागात एक पातळ पडदा असतो. हा पडदा पातळ आणि लवचिक असतो. पडदा फाटताना कदाचित रक्त येवू शकतं. परंतू हा पडदा फक्त संभोगाच्या वेळीच फाटतो असं मात्र अजिबात नाही. शारीरिक खेळ जसं पळणं, पोहणं, सायकल चालवणं यामुळं देखील हा पडदा फाटू शकतो. अनेक मुलांचा हा गैरसमज असतो की पहिल्या सेक्सच्यावेळी रक्त नाही आलं म्हणजे मुलीने यापूर्वी सेक्स केला आहे. त्यामुळं मनातील ही भिती काढून टाका की पहिल्या सेक्सच्या वेळी रक्त येईलच. आणि जरी असा रक्तस्त्राव झालाच तर तो काही काळाने आपोआप थांबेल. चिंता करु नका. नको असणारी गर्भधारणा आणि लिंग सांसर्गिक आजार टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 17 =