प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसिजर आपरेशन होऊन आठ वर्षे झाले तरीही सेक्स करतांना योनीत ओलावा निर्माण होत नाही त्यामुळे शिस्नास तेल लावावें लागते नाहीतर पत्नीला खूप त्रास होतो काहीतरी उपाय सांगा

1 उत्तर

योनीत योनीस्त्राव का तयार होत नाही याची कारणं शोधायला हवी आहेत, ती मानसिक आहेत की शारीरिक हे समजलं तर त्यावर उपाय करता येतील. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ /gynaecologist ला भेटा.

दुसरं अन महत्वाचं हे की संबंधांच्या वेळी तेल वापरु नका. तेल वा तेलयुक्त कुठलंच वंगण वापरु नका. तेल- तूप – क्रिम याने योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. थुंकीचा सुद्धा फार काही उपयोग उपयोग होत नाही.

म्हणुन के वाय जेली मेडिकलमध्ये मिळते (जी पाणी व ग्लिसरिनने बनवलेली असते) ती वापरा. निरोधच्या वर अशाच प्रकारचे वंगण असते. तेव्हा तुम्ही निरोध ही वापरु शकता. गरज पडल्यास निरोधवर ही केवाय जेली वापरु शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 2 =