प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स करतांना लिंग योनीप्रवेशवेळी ओलावा वाढवण्यासाठी एखादे gel सुचवा

1 उत्तर

संभोगाच्या वेळी जर स्त्रीच्या योनीला कोरडेपणा असेल (विशेषतः रजोनिवृत्ती आल्यावर) तर जेली वंगण (लुब्रिकंट) म्हणून वापरले जाते. वंगणामुळे घर्षण कमी होतं. जोडीदाराला त्रास कमी होतो व निरोध फाटण्याची शक्यताही कमी होते. ज्या वंगणामुळे शरीराला अपाय  होणार नाही, घर्षण कमी होईल आणि ज्यामुळे निरोध फाटणार नाही असं वंगण वापरलं पाहिजे. अनेकजण  घरगुती तेलयुक्त पदार्थांचा वंगण म्हणून वापर करतात. पण त्यामुळे निरोध फाटण्याची शक्यता  वाढते. शिवाय अशा घरगुती तेलयुक्त पदार्थांमुळे योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. मेडिकलच्या दुकानात ‘केवाय जेली’ किंवा इतर जेली मिळतात त्याचा ओलावा वाढण्यासाठी वंगण म्हणून वापर करू शकता.  काही जणांना या जेलींचा वापर केल्यावर अॅलर्जी होऊ शकते त्यामुळे शक्य असेल तर अशा जेलींचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 5 =