प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स करताना स्त्रीच्या योनीतुन पांढरे पाणी जास्तच जाणे योग्य आहे का

1 उत्तर

काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. बीज बिजकोषातून बाहेर पडल्यावर (२४ ते २८ तास पाळीच्या मध्यावर), गरोदरपणी आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाऊन कपडे खराब होऊ शकतात. हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मानसिक त्रास, रक्तपांढरी (रक्त कमी झाल्यामुळे) , झोप येत नसल्यास, असंतुलित आहार यामुळे सुद्धा अंगावरून नेहमीपेक्षा थोडे जास्त पांढरे पाणी जाऊ शकते.

काही वेळा मात्र अति प्रमाणात अंगावरून पांढरे जाते. यामुळे आतील आणि काही वेळा बाहेरचे सुद्धा कपडे ओले होतात. जंतूलागण झाल्याने असे आजार होऊ शकतात. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराच लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.

लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

Satish pawar replied 2 years ago

याच्यावर उत्तर काय आहे

let's talk sexuality replied 2 years ago

कशावर उत्तर ?

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 4 =