प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्वप्न दोष हा मुलींमध्ये पण आढळतो का आणि स्वप्न दोष हा झोपेत लैंगिक स्वप्न पडल्यावर होतो का
1 उत्तर

स्वप्नदोष हा शब्दच मुळात वापरणं थांबवलं पाहिजे. किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे. स्वप्नावस्थेमध्ये तुम्ही पाहत असलेलं स्वप्न लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारं असेल तर कदाचित लिंग ताठरता येवून परमोच्च क्षणी वीर्यपतनदेखील होवू शकतं. मुलींनाही झोपेमध्ये लैंगिक स्वप्न पडू शकतात. अशावेळी योनी ओलसर होते. मुलींच्या परमोच्च लैंगिक क्षणाच्यावेळी योनीमधून कोणताही स्त्राव येत नाही. त्यांना केवळ मानसिक अनुभव मिळतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 16 =