प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथून ,वासना, शारिरीक आकर्षण: ब्रम्हचर्य हि जीवन है या पुस्तकात मी हस्तमैथून गैर आहे पाप आहे असे वाचले

माझ वय १९ वर्ष आहे मी

ब्रम्हचर्य हि जीवन है या पुस्तकात मी हस्तमैथून गैर आहे पाप आहे असे वाचले , लैगिंक भावही मनात आसने वाईट आणि उत्तेजना कामूकता याला खुप विरोध आहे ह्या पुस्तकात

आणि तसेच मी धार्मिक असल्या मुळे आशा अध्यात्मिक पुस्तकाचा प्रभाव माझ्यावर लवकर पडतो

सोबतच मला हस्तमैथून करायची पोर्न फ्लिम्स पाहायची सवय आहे से्क्स या विषयात मी रूजलो आहे पन हे पुस्तक वाचल्या पासुन हस्तमैथून व मना मधे स्त्री यांचे गुप्तांग चा विचार करायला घाबरतोय माझ्या साठी आता तरीही शिश्न ताठ राहते मला काय करने योग्य आहे या वयात ब्रम्हचर्य कि हस्तैमथून ??

कृपया योग्य मार्गदर्शन करा …

1 उत्तर

खूपच चांगला प्रश्न तुम्ही इथं विचारला आहे. असे प्रश्न अनेक मुला-मुलींच्या मनात या वयात येतच असतात. ज्यावेळी अशा प्रश्नांची उत्तरं अनेक ठिकाणाहून वेगवेगळी मिळतात त्यावेळी खूपच गोंधळ उडतो.

अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुमचा स्वतःचा वैज्ञानिक दृष्टीकोन खूप उपयोगी पडतो. जसं तुम्ही सांगितलेल्या पुस्तकामध्ये हस्तमैथुन किंवा आकर्षण यांना वाईट सांगितलं गेलं आहे. हे पुस्तक कोणी? कोणत्या काळात? आणि कशासाठी लिहिलं गेलं आहे याची कारणं शोधू शकता. ब्रम्हचर्य ही एक जीवन जगण्याची पध्दत काही लोकांची असू शकते. परंतू ती प्रत्येकाने स्विकारलीच पाहिजे असा कोणताही नियम अस्तित्वात नाही.

आज विज्ञानाच्या संशोधनामुळं आपण हे निश्चितच म्हणू शकतो की शारीरिक आकर्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे. तसंच लैंगिक कृती करणंदेखील नैसर्गिक आहे. समाज मानवी विकासाच्या विविध टप्प्यांमधून गेला आहे. अजूनही जात आहे. लैंगिक गोष्टींना पाप-पुण्य मानयचं की नैतिक-अनैतिकतेवर तोलायचं हा प्रत्येकाचा व्यक्तीगत विचार असू शकतो. हे मात्र नक्की आहे की, धार्मिकतेचा पगडा जास्त आहे की वैज्ञानिक दृष्टीकोन जास्त विकसित आहे यावरुन समाजातील अनेक गोष्टी बदलत असतात. जसं पूर्वी विधवा विवाह अमान्य होता अनैतिक होता. धर्माच्या विरोधात होता. आज विधवा विवाह समाजानं मान्य केला आहे. स्त्रियांनी चूल आणि मूलच सांभाळलं पाहिजे असा विचार काही वर्षापूर्वी प्रत्येकाच्या मनात घट्ट रुजलेला होता, आज तो विचार स्त्रियांनी-पुरुषांनी नाकारायला सुरुवात केली आहे. आज महिला शिक्षण घेतात, स्वतःच्या पायावर उभं राहतात याला कोणीही विरोध करत नाही. याचा अर्थ समाजातील धार्मिक गोष्टींचा प्रवाभ विज्ञानामुळं कमी होण्यास मदत होते. माणूस तर्काने विचार करायला लागतो. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणं भाव शोधायला लागतो. अर्थात ज्यांच्यांवर धार्मिक गोष्टींचा प्रभाव जास्त आहे त्यांना वैज्ञानिक गोष्टी समजण्यास सुरुवातीला थोडी अडचण येवू शकते. मात्र एकदा का तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारायला सुरुवात केली की तुम्हाला एक नवी दिशा नक्की सापडेल. हस्तमैथुन करणं, शारीरिक आकर्षण असणं हे जर तुम्हाला पाप वाटत असेल तर हे मानून चाला की या जगातील जास्तीत जास्त माणसं पापी आहेत.

आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलू या. हस्तमैथुन करणं यात पाप-पुण्यांचा काहीही प्रश्न नाही. हस्तमैथुन करणं ही एक सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. यामुळं मनाला आणि शरीराला आनंद मिळतो. हस्तमैथुन करताना मात्र लिंगाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्या. हस्तमैथुन करताना मुलं-मुली मनामध्ये कोणतीही लैंगिक क्रिया इमॅजीन करत असतात आणि यात काहीही गैर नाही. शारीरिक आकर्षण वरती सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक आहेच परंतू ते कुठे आणि कसं व्यक्त करायचं याबद्दल समाजानुसार नियमांमध्ये विविधता आहे. ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला शारीरिक आकर्षण आहे त्या सर्वांसोबतच संभोग केला पाहिजे असंही नाही. शिवाय ज्यावेळी संभोगाचा प्रश्न येतो त्यावेळी दोघांची संमंती असणं खूप गरजेचं असतं. अन्यथा त्याला आपण बलात्कार म्हणू शकतो.

आता तुमच्या शेवटच्या प्रश्नांबद्दल बोलू या. तुम्ही ज्या वयात आहात ते वय अश्याच नवनविन गोष्टींचा शोध घेत असतं. जसं जसं तुम्ही वयाने मोठे व्हाल तुमचं वाचन वाढवाल तसं तसं तुमची वैचारिक प्रगल्भता वाढेल. ब्रम्हचर्य की हस्तमैथुन यापेक्षा शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्वाचं आहे. लिंग ताठ होत असेल, लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल तर निसंकोचपणे हस्तमैथुन करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 18 =