योनीमार्गाचे काही आजार

50,244

योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक प्रकारे आपल्याला योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची जाणीव होते. योनीमार्गातील जंतुसंसर्ग केवळ लैंगिक संबंधांमधून होत नाहीत. अंगावरून जाणं, पांढरं जाणं, पांढरा प्रदर, श्वेत प्रदर किंवा व्हाइट डिस्चार्ज अशी अनेक नावं या संसर्गांना किंवा इन्फेक्शन्सना आहेत.

योनीमार्गाला होणाऱ्या काही संसर्गांची माहिती पुढे दिली आहे.

कॅन्डीडीआसिस

कॅन्डीडा अलबीकन्स हा जंतू योनीमार्गातला व पचनमार्गातीला नेहमीचा रहिवासी असतो. शक्यतो हा जंतू कुठलाही त्रास देत नाही मात्र प्रमाणापेक्षा संख्या वाढल्यास त्यातून त्रास निर्माण होतो. कॅन्डीडाला ओलसर, ऊबदार वातावरण आवडते. पाळीच्या वेळेस योनीमार्ग ओलसर व ऊबदार असतो. तसेच रक्तामुळे अन्नाचीही कमतरता नसते. अशा वेळेस त्यांची संख्या वाढते व त्यामुळे पाळीच्या काळात किंवा नंतरच्या दोन दिवसांत योनीमार्गात खाज सुटते, दाह होतो. कॅन्डीडा योनीमार्गातला नेहमीचा रहिवासी असल्यामुळे पुढच्या पाळीनंतर परत हा त्रास होण्याची शक्यता आहे. अशावेळेस परत वरील उपचार करावेत.

लक्षणं

 • मायांग व योनीला खाज सुटते
 • पांढरट, दाट, आंबट वास येणारा स्राव
 • नेहमीपेक्षा योनीस्रावाचे प्रमाण जास्त
 • लघवी करताना जळजळ
 • लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना
 • योनी लालसर दिसते

हे करुन पहा (योनीमार्ग आम्ल करण्याकरिता काही उपाय)

 • कापसाचा बोळा आंबट दह्यात भिजवून योनीमार्गात ठेवा. (दर चार तासांनी बोळा बदला.)
 • अर्धा लिंबू एक तांब्याभर पाण्यात पिळा. त्या पाण्याने योनिमार्ग धुवा. (10 दिवस)
 • दही किंवा ताकाने योनिमार्ग धुवा. (10 दिवस)
 • जेनिशियन व्हायलेट (जी व्ही 1%) हे जांभळे औषध योनीच्या भिंतींना लावा. जी व्ही १% पेक्षा जास्त तीव्र असू नये. नाही तर योनिदाह होऊ शकतो. (हे औषध लावल्यावर पॅड किंवा घडी घ्या. नाही तर कपड्याला निळे डाग पडतील.)
 • वरीलपैकी कुठलाही उपाय करीत असताना रोज वाटीभर तरी दही खा.
 • योनीमार्गाला खाज सुटत असल्यास : कोरफडीचा गर पाण्यात विरघळवा. त्या पाण्याने मायांग धुवून काढा.
ट्रायकोमोनियासिस किंवा ट्रिक

ट्रायकोमोनास एकपेशीय परजीवी असून योनी, आतडी, गुदमार्गात आढळतात. बऱ्याच पुरूषांच्या मूत्रमार्गातही असतात मात्र पुरुषांमध्ये कुठलाही त्रास उत्पन्न करत नाहीत.

कारणे :

 • लैंगिक संबंधामुळे
 • गुदद्वारातून योनीमार्गात जंतुसंसर्ग
 • ट्रायकोमोनाज योनीतील स्वाभाविक आम्ल स्थिती जेव्हा कमी होते तेव्हा वाढतात. अशी परिस्थिती पाळीच्या आधी आढळते व तेव्हा यांची वाढ होऊ शकते.

लक्षणे :

 • योनीमार्गात प्रचंड खाज व सूज
 • लघवी करताना जळजळ
 • स्त्राव – हिरवट पिवळ्या रंगाचा, माश्यासारखा उग्र दर्प, फेसकट स्त्राव

हे करून पहाल : 

 • कडुलिंबाची ताजी 8-10 पानं बारीक वाटा. हे वाटण मऊ, स्वच्छ कापडाच्या तुकड्यामध्ये घ्या आणि त्याची बोटाच्या आकाराची पुरचुंडी करा व दोऱ्याने बांधा. योनीमधून ही पुरचुंडी आत सरकवा. दहा दिवस रोज सकाळ-संध्याकाळ असं करा.
 • त्याचप्रमाणे ठेचलेल्या कडुलिंबाची पानं टाकून उकळलेल्या पाण्यात थोडा वेळ बसा. योनिमार्गाला पाण्याचा स्पर्श होऊ द्या.
 • पुरुषांनी लिंगाच्या पुढच्या त्वचेखाली कडुलिंबाचे वाटण लावा.
 • नख न लागू देता लसणाची एक मोठी पाकळी सोला. योनिमार्गाच्या वरच्या भागात ही पाकळी सरकवा. दर सहा तासांनी पाकळी बदला. हा उपाय 15 दिवस करा. रोज एक लसूण पाकळी खा.
 • शौचाचे कण आणि त्यातील जंतू जर योनीमार्गात जात असतील तर परत परत ट्रिकची संसर्ग होऊ शकते. हे टाळण्यासाठी शैचानंतर गुदद्वार माकडहाडाच्या दिशेने धुवा. यामुळे गुदद्वारातले शौचाचे कण योनीमार्गात जाणार नाहीत.
बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस

योनीत अनेक प्रकारचे जीवाणू राहतात. त्यातले काही घातक असतात तर काही चांगले किंवा मित्र जीवाणू असतात. घातक जीवाणूंचं प्रमाण वाढल्यामुळे हा आजार होतो. हा खरं तर लैंगिक संबंधातून पसरणारा आजार नाही. मात्र हा आजार झाला असेल तर इतर लिंगसांसर्गिक आजार होण्याचा धोका वाढतो.

कारणे : 

 • योनीतील जंतूंचं संतुलन बिघडल्यामुळे हा आजार होतो. पण त्यासोबत इतरही काही कारणं आहेत.
 • रासायनिक, उग्र साबण वापरल्यामुळे – अंघोळीच्या वेळी योनी किंवा योनीमार्ग साबणाने धुणं टाळा. साबणातील रसायनांमुळे योनी कोरडी पडते.
 • पाळीच्या काळात पॅडप्रमाणेच योनीमार्गात सरकवून ठेवायचं टॅम्पून नावाचं साधन असतं. ते जास्त काळ योनीमार्गात राहिलं तर जंतूंचं प्रमाण वाढू शकतं.
 • डायफ्रामसारखं गर्भनिरोधक वापरत असाल तर

पाश्चात्य पद्धतीच्या कमोडच्या वापरामुळे, पोहण्याच्या तलावातील पाण्यातून किंवा एकमेकांचे बिछाने वापरल्यामुळे या आजाराची संसर्ग होत नाही.

लक्षणे : 

 • वारंवार लघवीला होणे
 • लघवी करताना जळजळ होणे
 • कंबरेत दुखणे
 • स्राव पिवळा, करडा असणे
 • योनीमार्गात खाज सुटणे
 • योनीमार्गाला कधी कधी सडलेल्या मासळीसारखा वास येणे

हे करून पहा : 

 • कडुलिंबाची ताजी 8-10 पानं बारीक वाटा. हे वाटण मऊ, स्वच्छ कापडाच्या तुकड्यामध्ये घ्या आणि त्याची बोटाच्या आकाराची पुरचुंडी करा व दोऱ्याने बांधा. योनीमधून ही पुरचुंडी आत सरकवा. दहा दिवस रोज सकाळ-संध्याकाळ असं करा.
 • त्याचप्रमाणे ठेचलेल्या कडुलिंबाची पानं टाकून उकळलेल्या पाण्यात थोडा वेळ बसा. योनिमार्गाला पाण्याचा स्पर्श होऊ द्या.
 • पुरुषांनी लिंगाच्या पुढच्या त्वचेखाली कडुलिंबाचे वाटण लावा.
 • नख न लागू देता लसणाची एक मोठी पाकळी सोला. योनिमार्गाच्या वरच्या भागात ही पाकळी सरकवा. दर सहा तासांनी पाकळी बदला. हा उपाय 15 दिवस करा. रोज एक लसूण पाकळी खा.

या आजारावर काही उपचार केले नाहीत तरी तो काही काळाने बरा होतो. मात्र दरम्यानच्या काळात लैंगिक संबंध आल्यास लिंगसांसर्गिक आजारांचा धोका वाढतो. व्हॅजिनोसिस झाला असताना सिफिलिस, परमा, ब कावीळ किंवा एच आय व्हीचा संसर्ग असेल तर तो संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

12 Comments
 1. Madhav Ghyar says

  Very good and useful information. Information is scientific. I like very much. Thanks.

  1. I सोच says

   thank you…

 2. shankarGorde says

  mi shankarGorde Amravati mazya patnila pandharya panyachi samsya aahe Tyas mule dok ,manechya dand , hatpayat gole, thakvayete, thrthari sutate yamule kamjoria Ali aahe karita upay dyave

  1. I सोच says

   तुम्ही लिहिलेली लक्षणे पाहता तुमच्या पत्नीला नक्की काय झाले आहे, याचे निदान स्त्रीरोगतज्ञच(Gynecologist) करु शकतील. तेव्हा लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

 3. Dhiraj says

  योनी वर खाज सुटले काय करण आहे

  1. lets talk sexuality says

   नक्की काय कारण आहे हे समोर पाहूनच कळेल, त्यासाठी एखाद्या स्त्रीरोगतज्ञाना भेटा व त्यांचे मार्गदर्शन घ्या.

   पुढील वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर विचारावा.

 4. Sonal says

  Hello sir
  Mla 6 month pasun yoni margatun khup vaas yeto ani white panihi khup jat tyavar kahi suggest kra

  1. let's talk sexuality says

   जर सहा महिन्यांपासून तुम्हाला त्रास होतोय तर आम्ही सुचवू की, तुम्ही लवकरात लवकर एखाद्या स्त्रीरोगतज्ञांना भेटा.

 5. दिव्या शिंदे says

  जव्हा पण मी माझा पती सोबत सेक्स करते तेव्हा योनीत लिंग टकातात तेव्हा त्रास होतो व सेक्स करताना जेव्हा ते थर्स देतात तेव्हा काही वेळा माझा स्तना मधुन दुधा सारखा पदार्थ निघण्यास सुरवात होते व काही वेळा तर खुप जास्त प्रमाणात बाहेर येतो तेव्हा माझे पती लहान मुला सारखे स्तना ना तोड लाऊन पिणयास सुरवात करतात तर काय हे स्तना मधुन निघणारा दुधा सारखा पदार्थ पिल्यास काही परीणाम होतो का व असे पिणे योग्य आहे का व मला असे का होत असेल

  1. let's talk sexuality says

   स्तनांमधून स्त्रावलेले द्रव पिण्यात योग्य किंवा अयोग्य असे काहीच नाही. ते प्यायचा कि नाही हा तुमच्या दोघांचा निर्णय आहे. जर तुम्हाला तसे केलेले आवडत नसेल तर तुम्हीच नक्कीच नाही म्हणू शकता. त्या पदार्थाचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. बाळंतपणामध्ये असा स्त्राव येणे अतिशय सामान्य आहे. पण बाळंतपणाव्यतिरिक्त/ बाळ नसले तरी जर असा स्त्राव स्तनांमधुन येत असेल तर मात्र असा स्त्राव अवेळी का येत आहे हे शोधणे गरजेचे असते. तेव्हा स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घेणे फार महत्वाचे ठरते. तसेच जर संबंध ठेवताना त्रास होत असेल किंवा वेदना होत असतील तर त्याची ही काय कारणे आहेत हे ही शोधले पाहिजे म्हणुन यासाठी ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 6. दिव्या शिंदे says

  माझे वय 19 आहे मला पिरीएड चालु असताना माझा पतीनी काही प्रोटेक्शन न वापरता माझा सोबत सेक्स केला होता व सेक्स करताना माझा पिरीएड चे रक्त त्याचा लिंगावर लागलेले होते तरी पण त्यानी न धुता सेक्स करत राहीले याने त्याना किवा मला काही आजार तर होणार नाहीना

  1. let's talk sexuality says

   मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही.पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
   अधिक माहितीसाठी सोबतची लिंक वाचा. https://letstalksexuality.com/sex_during_periods/

Comments are closed.