सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ६ – विवाहांंतर्गत बलात्कार आणि कायदा !

1,665

 

नव-याने बायकोच्या मनाविरुद्ध केलेले शारीरिक संबंध हा बलात्कार कसा होऊ शकेल? मग लग्न केलेच कशाला? बायकोचे हे कर्तव्यच आहे, असा प्रश्न ब-याच पुरुषांना पडतो. या प्रश्नामागचे गौडबंगाल आहे तरी काय? यामागे खरंच काही तथ्य आहे का? जर असे काही घडले तर महिलांना याविरुद्ध दाद मागण्यासाठी काही कायद्याचे पाठबळ आहे का? परदेशांमध्ये हा विषय गांभीर्याने घेतला जातो का?  तिथे  विवाहांतर्गत बलात्काराबाबत काही कायदे आहेत का?

तसेच विवाहांतर्गत बलात्काराबाबत काही अभ्यास झाले आहेत, त्यात काय तथ्ये मिळाली का?  अशा अनेक प्रश्नांवर आजच्या या भागात चर्चा केलेली आहे. मागच्या भागाप्रमाणेच आजही ऍड्व्होकेट अर्चना मोरे आपल्या भेटीला आलेल्या आहेत. अन सोबत आपले लाडके निहार अन गौरी आहेतच.

तेव्हा तुम्ही ऐका अन तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही ऐकवा.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

Comments are closed.