Safe Journeys…

Let’s explore the matters of love, relationships, intimacy and sexuality.

3,255
प्रयास आरोग्य गट ही संस्था गेली अनेक वर्ष एच. आय. व्ही. आणि लैंगिकता या विषयावर काम करत आहे.  प्रयासने त्यांच्या टेक्नो-पीअर (Techno -peer ) या प्रकल्पातंर्गत एक नवीन वेब सिरीज तयार केली आहे. सेफ जर्नीज (Safe Journeys ) असे नाव असलेल्या या मालिकेमध्ये लैंगिकता या विषयातील अनेक मुद्दे जसे की सुरक्षित लैंगिक संबंध, पॉर्न आणि हस्तमैथुनाचे व्यसन, जोडीदारांमधील संवाद, बाल लैंगिक अत्याचार, मानसिक स्वास्थ्य, संमती इ. मुद्दे व्हिडिओच्या माध्यमातून हाताळले आहेत. प्रयासतर्फे दुसऱ्या एका संशोधन प्रकल्पात ( युथ इन ट्रान्सिशन) पुण्यातील १२४० युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या गेल्या. या संशोधनात आढळून आलेल्या अनेक मुद्द्यांच्या आधारे हे सर्व व्हिडिओस बनवले गेले आहेत. विविध विषयांवरील एकूण ८ व्हिडिओस दर बुधवारी एक याप्रमाणे ३ एप्रिल २०१९ पासून युट्युब व फेसबुक  वर  प्रदर्शित केले जात आहेत.
एपिसोड ८ – फिल्म – ग्रीन सिग्नल 

संमती म्हणजे नक्की काय ?

शांत राहण्याचा अर्थ संमती आहे असा असतो का ?

संमती देण्याघेण्यातली संदिग्धता कशी काढून टाकायची ?

सेफ जर्नीस च्या या शेवटच्या फिल्म मध्ये संमतीविषयी (म्हणजेच कंसेंट) आपण बोलत आहोत. कुठल्याही नातेसंबंधांमध्ये अतिशय महवाची असणारी गोष्ट म्हणजे संमती. अनुपम बर्वेने दिग्दर्शित केलेल्या या फिल्म मध्ये थोड्या हलक्या फुलक्या पद्धतीने संमती विषयी बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

 

एपिसोड ७ – फिल्म – नॉट माय फॉल्ट  
आपल्या समाजात बाल लैंगिक अत्याचार होतात ते समाज स्वीकारेल का?
लैंगिक अत्याचाराबद्दल बोलणे किती महत्वाचे आहे ?
लैंगिक अत्याचाराचे काय परिणाम होऊ शकतात?
ही फिल्म वरून नार्वेकर नी दिग्दर्शित केली असून यात लहानपणी घडलेल्या  लैंगिक अत्याचाराविषयी मांडणी केली गेली आहे. लहानपणी झालेल्या त्या अत्याचाराचे किती दूरगामी परिणाम असू शकतात आणि त्यावर काय प्रकारे उत्तरे शोधता येऊ शकतील अश्या आशयाची मांडणी या फिल्म मध्ये केली गेली आहे.

 

एपिसोड यु टर्न
नको असलेले गर्भारपण कसे हाताळावे ?
गर्भपात भारतात कायदेशीर आहे का ?
मुल होण्यासाठी लग्न गरजेचे आहे का ?
ही फिल्म अनुपम बर्वेने दिग्दर्शित केली असून यात मुख्यतः नको असलेल्या गर्भारपणाबद्दलच्या गैरसमजुती, कायदेशीर बाबी आणि ते कसे हाताळावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

एपिसोड  – माय वे
लोक काय म्हणतील ?
मी वेगळा असेन तर मला लोक स्वीकारतील का ?
माझ्या वैयक्तिकतेचा मान राखला जायील का ?
ही फिल्म वरुण नार्वेकरने दिग्दर्शित केली असून यात मुख्यतः स्वतःची ओळख, माणसांचे आणि त्यांच्या असण्याचे वैविध्य या विषयांवर भाष्य करते.

 

एपिसोड ४ – फॉग लायीट्स 
नैराश्य म्हणजे सगळ्याचा शेवट आहे का ?
त्यातून बाहेर कसे पडायचे ?
जर कोणी मानसिक उलाथापालठीतून जात असेल तर त्याच्यापर्यंत कसे पोचायचे ?
ही फिल्म आलोक राजवाडे नी दिग्दर्शित केली असून यात मानसिक स्वास्थ्याविषयी चर्चा केली आहे. अनेकदा ब्रेक अप सारख्या गोष्टींमुळे नैराश्य येऊ शकते. त्यावर मात कशी करता येऊ शकेल आणि जर आपल्याशी त्याविषयी कोणी बोलत असेल तर आपण त्याला कसा प्रतिसाद द्यावा या बद्दल ही फिल्म भाष्य करते.

 

एपिसोड ३ – थांबा, पहा, पुढे जा 

नातेसंबंध गुंतागुंतीचे का आहेत?

माझ्या पार्श्वभूमीचा माझ्या नातेसंबंधावर परिणाम होतो का?

नात्यामध्ये संवाद करणे किती महत्वाचे आहे?

या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या मालिकेतील तिसरा एपिसोड खालील लिंक वर जाऊन नक्की पहा.

एपिसोड २ – देखो मगर 

हस्तमैथुन केल्याने अशक्तपणा येतो का ?

किती वेळ पॉर्न बघणे हे त्रासदायक होऊ शकते ?

मला पॉर्नचे किंवा हस्तमैथुन करण्याचे व्यसन लागलंय का ?

या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या मालिकेतील दुसरा  एपिसोड खालील लिंक वर जाऊन नक्की पहा.

एपिसोड १ – कब कब जब जब  

प्रत्येकच वेळी कंडोम वापरणे गरजेचे आहे का ?

मला लिंगसांसर्गिक आजार (STI) आहेत का नाही हे कसे कळणार ?

लिंगसांसर्गिक आजार (STI)  कोणालाही होऊ शकतात का ?

या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या मालिकेतील पहिला एपिसोड खालील लिंक वर जाऊन नक्की पहा.

या वेबसिरीज मध्ये येणारे पुढचे व्हिडीओ पाहण्यासाठी आजच चॅनेल सब्स्क्राईब करा, लाईक करा अन आपल्या मित्र-मैत्रिणीं सोबत शेअर  करा. अन विसरलात तर आम्ही आहोतच की आठवण करुन द्यायला !

अधिक माहितीसाठी Safe Journeys  या संकेत स्थळाला नक्की भेट द्या.

Comments are closed.