SAY IT – नाही म्हणजे नाही

1,395

एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच नकोशा असणाऱ्या गोष्टींना नकार देणंही तितकंच महत्त्वाचं… एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात किंवा परिस्थितीत अवघडल्यासारखं होत असेल, असुरक्षित वाटत असेल किंवा भीती वाटत असेल तर नाही म्हणण्याचा किंवा नकार देण्याचा अधिकार आहे. खूप जवळच्या नात्यांमध्ये किंवा प्रेमामध्ये नकार अतिशय स्पष्टपणे सांगावा लागतो. तुम्ही नकार दिलात तर त्याचे नक्कीच काही परिणाम होतील. पण नको त्या प्रसंगात अडकण्यापेक्षा त्या परिणामाचा मुकाबला करणं कधीही चांगलं.

‘नाही म्हणजे नाहीच असतं’ आणि ते तितक्याच ठामपणे सांगणं आवश्यक असतं.

‘नकाराचा अधिकार’ याविषयी बोलणारा ‘तथापि’च्या पुढाकाराने ‘आयसोच’ प्रस्तुत ‘SAY IT’ हा व्हीडीओ अवश्य पहा.

Comments are closed.