लैंगिक हिंसेला “No” म्हणा : लैंगिक हिंसेच्या प्रतिबंधासाठी अॅप
लैंगिक हिंसा आणि छळवणूक ही जगाला भेडसावणारी एक समस्या आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या जवळपास रोज आपल्याला वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. २०१४ मध्ये भारतामध्ये ३७०० पेक्षा ही जास्त महिलांवर अत्याचार झाल्याची नोंद आहे आणि खरी आकडेवारी तर यापेक्षा दुप्पट असू शकेल.
अशी बरीच उदाहरणं देता येतील ज्यामध्ये महिलांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा घटना जरी रोज घडत असल्या तरी जे असे कृत्य करतात त्यांना कुठलाही वचक नसतो.
ज्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचार होतो त्यांच्यावर जबरदस्त शारीरिक, मानसिक आघात होतात हे लोकांना आता लक्षात यायला लागलंय. भारतामध्ये बऱ्याच व्यक्ती लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत, काहीजण पिडीत व्यक्तींना उपचार देत आहेत तर काहीजण घटना घडण्याआधी प्रतिबंध व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत.
NO app म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी विकसित केलेले एक मोबाईल अॅप आहे. NO app हे लैंगिक अत्याचाराचा प्राथमिक प्रतिबंध या कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्यामध्ये के.ई.एम. हॉस्पिटल संशोधन विभाग, पुणे, बायर इंडिया, भारती विद्यापीठ, आणि शरीते बर्लिन यांचा एकत्रित सहभाग आहे. हे अॅप सहज वापरता यावं यासाठी जनमत घेण्यासाठी काही सर्वे करण्यात आले.
NO अॅप मध्ये असे लोकं एकत्रित येतात, जे लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आहेत. हे अॅप डाऊनलोड करून रजिस्टर केल्यानंतर तुम्ही या समुदायाचा एक भाग होता ज्याचा उद्देश लैंगिक अत्याचाराचा निषेध करणे हा आहे. या नंतर एखादी व्यक्ती संकटात असेल तर ती कुठे आहे ते तुम्हाला समजेल. जितके जास्त लोकं हे अॅप वापरतील तितकी जास्त लोकं मदतीला येऊ शकतील त्यांमुळे जास्तीत जास्त लोकांकडे हे अॅप असणे गरजेचे आहे की जेणे करून असे कृत्य करणाऱ्यांना आळा बसेल आणि ती लोकं असे कृत्य करण्यास धजावणार किंवा असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.
या अॅपचा मुख्य भाग म्हणजे संकटकालीन वेळेस कॉल सेट करणे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संकटात असाल, त्यावेळी तुमच्या अॅपवरील NO चे बटन दाबल्यावर किंवा मोबाईलचे पॉवर बटन दाबल्यावर हा कॉल तुम्ही निवडलेल्या तुमच्या संपर्क यादीतील व्यक्तींना म्हणजे मित्र-मैत्रिणींना, परिवारातील व्यक्तींना पाठविला जाईल, ज्यामध्ये तुम्ही कोठे आहात हे ही दर्शविले जाईल. या शिवाय, तो कॉल तुम्ही ज्या भागात आहेत आणि ज्यांच्याकडे हे अॅप आहे त्यांच्याकडे तसेच २४/७ कॉल सेंटरला आणि पोलिसांना फॉरवर्ड केला जातो ज्यामुळे संकटात असलेल्या व्यक्तींना तातडीची मदत मिळू शकते.
जर तुम्हांला स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवायचे असेल तर हे अॅप डाऊनलोड करून घ्या आणि या समुदायाचा एक हिस्सा व्हा आणि लैंगिक अत्याचाराला नाही म्हणा! तुम्ही बदल घडवून आणू शकता. एका क्लिकवर तुम्हाला मदत मिळू शकते.
या ! एक पाऊल पुढे टाकूयात लैंगिक अत्याचाराचा प्रतिबंध करूयात !
“NO” अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/NOAppIndia/
https://www.instagram.com/The_NO_App/’
https://twitter.com/The_NO_App