गरोदरपणातील लैंगिक संबंध
गरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयी, कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावेत? गरोदरपणात संबध ठेवल्यावर काही समस्या निर्माण होतात का? गर्भाला काही धोका असतो का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी प्रश्न विचारले गेले. गरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयीची काही महत्वाची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.
दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. वास्तवात गर्भ धारणा झाली आहे हे बहुतेक वेळेस दुसऱ्या महिन्यात लक्षात येते. त्यामुळे गरोदरपणाच्या अगदी प्राथमिक टप्प्यात शरीर संबंध आलेले असण्याची शक्यता असतेच. शरीर संबंधांचा गर्भावर कसलाही परिणाम होत नाही.
पूर्वी जर एकापेक्षा अधिक गर्भपात झाले असतील किंवा तसा काही इतिहास (हिस्ट्री) असेल, तर डॉक्टर बरेचदा पहिल्या काही महिन्यात शरीर संबंध टाळण्याचा सल्ला देतात. असा काही इतिहास असेल तर लिंग योनी मैथुन टाळावा. गरोदरपणात गर्भाशयाचे तोंड उघडणे किंवा रक्तस्त्राव (स्पॉटिंग) होणे गंभीर असते. अशी शक्यता वाटत असेल तर तुम्हाला शरीर संबंध टाळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. स्त्री पहिलटकरीण असेल, तर प्रसूतीपूर्वी दोन आठवड्यादरम्यान गर्भाचे डोके मातेच्या कटीभागात उतरते. म्हणून गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यात संभोग करू नये. नंतरच्या गर्भारपणात असे होत नाही, म्हणून शेवटच्या महिन्यातही संभोग करायला हरकत नाही.
गरोदरपणाच्या नंतरच्या काळात म्हणजे गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात किंवा शेवटच्या तीन महिन्यात पोटाचा वाढलेला घेर कदाचित अडथळा ठरू शकतो किंवा ओटीपोटावर जोर किंवा दाब पडण्याची शक्यता असते. म्हणूनच या काळात संभोग करताना थोडी काळजी घ्यावी. आपल्या शरीराचा दाब स्त्रीच्या पोटावर पडू नये यासाठी पुरुषाने संभोगावेळी आपले तळहात जमिनीवर टेकवावेत, हात कोपरात सरळ राखावेत व शरीराचा भार तळहातावर पेलून संभोग करावा; किंवा पुरुषाने बसून संभोग करावा. योनीत खोलवर शिश्नाचा प्रवेश करू नये. घर्षण जोराने करू नये. योनिद्वाराला हाताने स्पर्श करू नये. संभोगापूर्वी शिश्न धुवून घ्यावे. या काळात स्त्रीला पुरुषापासून एस. टी. आय. म्हणजेच लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत म्हणून संभोग करताना पुरुषाने निरोध वापरावा.
या परिस्थितीत अन्य एखाद्या पोझिशनचा विचार करता येईल उदा. शरीर संबंधांच्या वेळी स्त्री जोडीदार वरती असेल. जर जोडीदाराला लिंग संसर्ग झालेला असेल तर तो पूर्ण बरा होइपर्यंत संबंध न येऊ देणं गरजेचंच आहे. या आणि अशा काही परिस्थिती सोडल्या तर शरीर संबंधांवर इतर कुठलीही बंधनं आणण्याची गरज नाही. अर्थातच दोन्ही जोडीदारांची इच्छा आणि संमती महत्वाची.
चित्रसाभार : https://singaporemotherhood.com/articles/2013/06/pregnancy-sex-to-do-it-or-not-to-do-it/
What is S. T. I
सर
सरमाझे लगिन झाले आहे मी आणि माझी बायको सेक्स करताना मला माझ्याबायकोचे स्तन तोडात घ्यावे वाटत होते ्पण मी नाही घेतले नंतर मग4 दिवसानी सेक्स करताना बायको सेक्स चाआनंद भेटत होता त्या भराते ती बोलली की माझे स्तन तोडात घ्या मी ते घेतले पण नंतर मला स्तन तोडात घेवून पाप केले असे वाटू लागले, 4 दिवस मला ते डोक्यातुन जाईना कारण स्तन हे लहान बाल दुध पिते आपण स्तन तोडात घेवुन पाप केले असे वाटू लागले तसेच मला बायकोचे स्तन खुप आवडते आता मला लहान मुलगी आ हे तर स्तन तोडात घेणे चुकीचे ठरेल काय६महिने झाले हा प्रशन कोणास सांगु असे वाटत होते ते मी आज तुम्हास बोललो हर प्लीज सांगा
तुम्ही निसंकोचपणे प्रश्न विचारला त्याबद्दल अभिनंदन .
तुम्ही विनाकारण टेंशन घेत आहात असं दिसतंय. तुम्ही केलेलं वर्तन हे शारीरिक संबंध करतानाचे सामान्य वर्तन मानलं जातं.
बाळासाठी म्हणुन जर निसर्गाने ही स्तनांची रचना केलेली असली तरी लैंगिक सुख अनुभवताना स्तनांना स्पर्श करणं (हाताने, तोंडाने इ.) काहीही चुकिचं नाही आहे. स्तनांमध्ये दूध ग्रंथी असतात आणि बाळाचा जन्म झाल्यावर त्यामध्ये दूध तयार होते. पण केवळ दुधाची निर्मिती इतकाच स्तनांचा विचार करता येणार नाही. स्तन आणि स्तनाग्रं लैंगिक संबंधांमध्ये, प्रणयामध्ये मोठी भूमिका निभावू शकतात. तेव्हा तुम्ही तुमच्या लैंगिक सुखासाठी पत्नीच्या संमतीने जे करत आहात ते पाप नाहीये. निश्चिंत असा.
ओरल सेक्स करणं योग्य आहे की नाही?
असे केल्याने त्याचे काही परिणाम होतो काय?
Safe ओरल सेक्स कसा करावा जेणकरून त्याचा कुटलाही दुष्परिणाम होणार नाही?
जोडीदारांच्या संमतीने मुखमैथुन करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. जर मनात मुखमैथुन करताना आपण चुकिचे किंवा वाईट करतोय अशी भावना असल्यास त्रास होऊ शकतो. पण जर काळजी (निरोधचा वापर करुन) घेऊन मुखमैथुन केले तर काहीच अडचण नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/dental-dam/
सर माझ मला एक प्रश्न पडलाय की, माझ्या बायको चं कुटुंबनियोजनची शस्त्रक्रिया करून आता नुकताच एक महिना होत आला आहे.
परंतु सदर शस्त्रक्रिया झाल्यानतर किती दिवसांनी अथवा महिन्यानंतर शरीर संबंध ठेवणे योग्य असतं?
हे खरं तर तुमच्या पत्नीच्या शारीरिक व मानसिक स्थितीवर अवलंबुन आहे.
शारीरिक बाबींसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणं उचित ठरेल. अन शारीरिक त्रास कमी होऊन मनाची तयारी होण्यासाठी जो वेळ तुमच्या पत्नीला हवा आहे तेवढा वेळ घेऊन, त्याच्या मर्जीनूसार शरीरसंबंध ठेवणंच योग्य ठरेल.
नमस्कार,
सर बायकोला दुसरा महिना पूर्ण होतो आहे.पण तिचा आणि माझा सेक्स करण्याची तीव्र इच्छा होत आहे काय करू??
काळजी घ्या, एकमेकांची संमती घेऊन करु शकता.